ठळक बातम्या

सिंधूच्या पदरी पुन्हा निराशा

बाली – ऑलिम्पिकमध्ये देशासाठी दोन पदकांची कमाई करणाऱ्या सिंधूला ‘बीडब्लूएफ’ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याचे तिचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूला दक्षिण कोरियाच्या ॲन सियोंगचे हिने २१-१६ २१-१२ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.
डेन्मार्क ओपन स्पर्धेतही सिंधूला तिनेच पराभूत केले होते. यापूर्वी २०१८ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी सिंधू ही एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केल्यामुळे यंदाच्या स्पर्धेत तिच्याकडून जेतेपदाची अपेक्षा होती, पण दक्षिण कोरियाच्या अव्वल ॲन सियोंगने पुन्हा एकदा सिंधूला पराभवाचा दणका दिला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …