ठळक बातम्या

सिंघू सीमेवरील आंदोलनस्थळी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली – पंजाबमधील सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलनाच्या स्थळी एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने बुधवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी आंदोलनस्थळी एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत तो शेतकरी आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार गुरप्रीत सिंग, असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, तो पंजाबमधील फतेहगढ साहिबमधील अमरोह जिल्ह्यातील रहिवासी होता. तो ‘भारतीय किसान युनियन एकता’शी संबंधित होता. २०२०च्या तीन शेती कायद्यांविरोधात उत्तर भारतातील अनेक शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेती सुधारणा कायदा २०२० मागे घ्यावा, यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. पिकांना किमान आधारभूत किमतीची हमी देण्यासाठी नवीन कायदा करावा यांसारख्या मागण्या घेऊन शेकडो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील वर्षीपासून आपल्या हक्कासाठी तळ ठोकून आहेत. २६ नोव्हेंबर रोजी या शेतकरी आंदोलनाला १ वर्ष पूर्ण होत आहे. त्याआधीच ही देश हादरवून टाकणारी घटना घडली आहे. २९ नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना, दररोज ५०० ट्रॅक्टर शेतकरी संसदेकडे कूच करणार आहेत. सिंघू सीमेवर मंगळवारी झालेल्या बैठकीत शेतकरी आंदोलनाची पुढील रणनीती ठरविण्यात आली आहे.
शेतक ऱ्­यांसोबत केंद्राच्या आतापर्यंत ११ औपचारिक बैठका झाल्या आहेत; मात्र नवीन कायदे शेतकरी हिताचे असल्याच्या भूमिकेवर केंद्र सरकार ठाम आहे. युनायटेड किसान मोर्चाने २६ नोव्हेंबरला दिल्लीच्या सीमेवर मोठ्या सभा घेण्याची घोषणा केली आहे. त्याच दिवशी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानपासून दिल्लीपर्यंत सर्व आघाड्यांवर प्रचंड जनसमुदाय जमा केला जाईल आणि मोठे मेळावे घेतले जातील. दिल्लीच्या सीमेवर असलेल्या सर्व राज्यांच्या राजधानीत शेतकरी एकत्र येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …