सिंगर-रॅपर ड्रेकने मागे घेतले आपले दोन ग्रॅमी नॉमिनेशन


प्रख्यात कॅनेडियन सिंगर आणि रॅपर ड्रेकने आपले दोन ग्रॅमी नॉमिनेशन मागे घेतले आहेत. खरेतर त्याच्या या निर्णयामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एका रिपोर्टनुसार या 35 वर्षीय कलाकाराने आपले दोन नॉमिनेशन ‘सर्टिफाईड लव्हर ब्वॉय’ साठीचे सर्वश्रेष्ठ रॅप अल्बम आणि त्याचे गाणे वे टू सेक्सी’ करिताचे सर्वश्रेष्ठ रॅप प्रदर्शन हे परत मागे घेतले आहेत. ड्रेकने हा निर्णय आपल्या मॅनेजमेंटबरोबर सल्लामसलत केल्यानंतरच घेतला आहे. ड्रेकच्या या निर्णयामागे त्याचे हे ॲवॉर्ड आणि ते आयोजित करणाऱ्या संस्था तसेच रेकॉर्डींग अकादमीबरोबर प्रदीर्घ काळापासून असलेले वादग्रस्त संबंध हे कारण असल्याचे मानले जात आहे. ड्रेकने आतापर्यंत चार ग्रॅमी ॲवॉर्ड पटकावले आहेत. त्याला 2017 मध्ये हॉटलाईन ब्लिंगसाठी तर 2019 मध्ये गॉड्स प्लॅन व 2013 मध्ये टेककेअर या गाण्यासाठी पुररस्कार देण्यात आले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …