साहिल खानला मुंबई हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई – आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर मनोज पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात अभिनेता साहिल खानला आज मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. पाटील यांना साहिलने आत्महत्येसाठी प्रवृत्त केले, असे प्रथमदशर्नी आढळत नाही, असे निरिक्षण न्या नितीन सांब्रे यांनी व्यक्त केले आहे. साहीलला पंचवीस हजार रुपयांचा जामीन मंजूर केला असून तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.
सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगमुळे पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र वेळीच उपचार मिळाल्यामुळे पाटील यांचा जीव बचावला होता. साहिल आणि पाटील यांच्यामधील ब्रॅण्ड वॉरमुळे सोशल मीडियावर यावर चर्चा झाली होती. त्यातून साहिलच्या समर्थकांनी पाटील यांना ट्रोल केले. त्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीतून ही घटना घडली, असे ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे. पाटील यांच्या निकटवर्तीयांनी याबाबत आरोप केले आहेत. मात्र साहिलने या आरोपांचे खंडन केले आहे. साहिलने स्टाईल या सिनेमात काम केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …