सावध रहा! परिस्थिती बदलून गंभीर होऊ शकते – केंद्राचा राज्यांना इशारा

नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गंभीर इशारा दिला आहे. देशात सध्या फक्त ५ ते १० टक्के रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. मात्र, परिस्थिती झपाट्याने बदलू शकते, असा इशारा केंद्र सरकारने दिला. केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहिले आहे. दुसऱ्या लाटेत २० ते २३ टक्के ॲक्टिव्ह रुग्णांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता होती. या तुलनेत सध्या फक्त ५ ते १० टक्के ॲक्टिव्ह रुग्णांनाच हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता आहे. अशी स्थिती असली, तरी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, सध्याची परिस्थिती पाहता काहीही ठोस सांगता येऊ शकत नाही. येत्या काळात परिस्थिती बदलून गंभीर होऊ शकते, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता केंद्र सरकारने राज्यांना या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अचानक वाढूही शकते, एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या, हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागलेले रुग्ण, होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या, ऑक्सिजन बेडची स्थिती, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर सपोर्ट यावर रोज बारकाईने लक्ष ठेवण्याची सूचना केंद्राने केली आहे, तसेच आरोग्य सुविधांद्वारे आकारले जाणारे पैसे न्याय्य आहेत का?, याची खात्री करण्यास सांगितले. रुग्णांकडून अतिरिक्त वसुली तर होत नाहीत ना, या बाबतीत निरीक्षण आणि कारवाईसाठी यंत्रणा तयार करावी. कोविड केअर सेंटरमधील बेड्स आवश्यक असेल, तेव्हा ऑक्सिजनवरील बेडमध्ये अपग्रेड करा, अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …