सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

मुंबई – सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आपणा सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरिता हजर होईन. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी, असे आवाहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याबरोबरच राज्यातील नेते मंडळींनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपण्याच्या शेवटच्या दिवशी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे, तर नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही कोरोनाची लागण झाल्याची त्यांनी माहिती दिली आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …