सारा आणि अनन्याने चकाचक गाण्यावर केला भन्नाट डान्स

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानचा आगामी चित्रपट अतरंगी रेचे गाणे चकाचक जे या आठवड्याच्या सुरुवातीलाच रिलीज झाले होते ते लोकांमध्ये चांगलेच लोकप्रिय ठरले आहे.

ए. आर. रहमानच्या या कम्पोझिशनवर न केवळ चाहतेच इन्स्टा रील्स बनवून थिरकताना दिसतायेत, तर त्यांच्या जोडीने विक्की कौशल आणि अनन्या पांडेसारखे कलाकारही या गाण्यावर ठुमके लगावण्यापासून स्वत:ला रोखू शकलेले नाहीत. सध्या सोशल मीडियावर सारा अली खान आणि अनन्या पांडेचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत या दोन्ही सुंदर अभिनेत्री चकाचक गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहेत.
सारा अली खानने आपल्या अधिकृत इन्स्टा हँडलवर आपला एक लेटेस्ट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सारा व अनन्याचा धमाकेदार डान्स पाहायला मिळत आहे. एका अ‍ॅवॉर्ड गालाच्या शॉर्ट व्हिडीओ क्लिपमध्ये या दोघी चकाचक गाण्याचे हुक स्टेप घेताना दिसून येतायेत. साराच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिने हा व्हिडीओ आपले सिग्नेचर तुकबंदी वाले कॅप्शनसह शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना साराने कॅप्शनमध्ये लिहिलेयं ‘चकचक मुली ठुमका आणि ट्विल्स. डिअर अनन्या पांडेने हे खूप लवकर आत्मसात केले.’

या व्हिडीओत सारा आणि अनन्याची जबरदस्त डान्सिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …