सायनाची वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार

नवी दिल्ली – भारताची अनुभवी बॅडमिंटन पटू सायना नेहवालनेदुखापतीमुळेविश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधून माघार घेतली आहे. दुखपतीमुळे सायनानेआपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत प्रथमच जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपला मुकणार आहे. लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायनाने८ वेळा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहे. सायनाचा पती आणि सहकारी पारुपल्ली कश्यप यांनी तिच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे. सायनाला मांडीचा सांधा आणि गुडघ्याच्या दुखापतीचा खुप त्रास होत आहे. यामधून ती वेळेत बरी होऊ शकणार नसल्याने ती जागतिक स्पर्धेतून माघार घेत आहे, असे त्याने सांगितले.
स्पेनमधील हुएल्वा येथे १२ ते १९ डिसेंबरदरम्यान जागतिक अजिंक्यपद स्पर्धाखेळवली जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये डेन्मार्कमधील थॉमस आणि उबेर कप स्पर्धेतही सायनाला दुखापतीमुळे मुकावे लागले होते. तसेच फ्रेंच ओपनमध्येही दुखापतीमुळे ती पहिल्या फेरीचा सामना दुसऱ्या गेमनंतर खेळू शकली नव्हती. कश्यप म्हणाला, ‘उबेर चषकात तिला कंबरदुखी झाली होती. डेन्मार्कमध्ये स्पर्धेवेळी ती बरी होती पण दुखापत पूर्णपणे बरी झाली नव्हती. अशातच फ्रेंच ओपन खेळताना दुखापत आणखीनच वाढली आणि त्रास वाढत गेला आहे. आता १५ डिसेंबरपर्यंत तिची दुखापत कमी होण्याची शक्यता आहे, असेही तो म्हणाला. सायनाने २००६ पासून नेहमीच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतला आहे. २०१५ मध्ये तिने अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून पराभूत होऊन रौप्यपदक जिंकले होते. यापुढे २ वर्षांनंतर ग्लासगोमध्ये तिने कांस्यपदक जिंकले. सध्या गेल्या दोन वर्षांपासून सायना दुखापतींशी झुंज देत असून, टोकियो ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतही खेळू शकली नव्हती. ती आता जागतिक क्रमवारीत २३ व्या क्रमांकावर आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …