साऊथ सुपरस्टार सामंथा रुथ प्रभु सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. परंतु आता सामंथा चर्चेत असण्याचे कारण आहे ते म्हणजे तिचे पहिले आयटम सॉँग. बहुचर्चित पुष्पा चित्रपटातील ऊ अंतावा उ ऊ अंतावा हे आयटम सॉँग नुकतेच रिलीज झाले असून या गाण्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तेलगू मिडियामधून आलेल्या वृत्तानुसार पुरुषांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेने या गाण्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या गाण्यावर बंदी आणण्याची मागणी करण्यात येत आहे. या गाण्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत गाण्याचे जे बोल आहेत त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. या गाण्यामधून पुरुषांच्या मानसिकतेवर बोट ठेवण्यात आले असून पुरुष हे कायम सेक्स बद्दलच विचार करतात असेच या गाण्यातून दर्शविण्यात आले असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
पुष्पा हा चित्रपट तेलगू, तमिळ, हिंदी , मल्याळम आणि कन्नड अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये बनला असून या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हे लीड रोलमध्ये दिसून येणार आहेत.