ठळक बातम्या

साफसफाई करताना कचºयात सापडला मौल्यवान हिरा

७० वर्षीय महिलेला तिच्या आयुष्याच्या या टप्प्यावर हिरा सापडला, त्यामुळे तिचे आयुष्य आता राणीसारखे व्यतीत होणार आहे. घराची साफसफाई करताना महिला काही दागिने काढत होती. इतक्यात एक पूर्णपणे वेगळा दिसणारा हिरा तिला दिसला. आधी तो दगड समजून ती कचºयात टाकणार होती; पण नंतर जेव्हा तिने ते लिलाव करणाºयाला दिली, तेव्हा त्या महिलेच्या तिला आनंद अनावर झाले.
कधी कधी आपल्याच घरात आपल्याला अपेक्षित नसलेली गोष्ट सापडते. ब्रिटनमधील एका वृद्ध महिलेसोबतही असेच घडले. ती महिला घर साफ करण्यात व्यस्त होती, तेव्हा तिला एक तेजस्वी दगड दिसला. महिला सर्वप्रथम हिरा कचºयात फेकणार होती, जेव्हा तिने तो लिलाव करणाºयाकडे नेला, तेव्हा या दगडाची किंमत जाणून तिला धक्काच बसला.

तिला सापडलेला चमकदार दगड खरोखरच ३४ कॅरेटचा मौल्यवान हिरा आहे, याची त्या महिलेला अजिबात कल्पना नव्हती. जर या महिलेने घरातील उरलेल्या कचºयासह ते फेकले असते, तर तिने २ दशलक्ष पौंड गमावले असते. तथापि, महिलेचे नशीब चांगले होते आणि तिने ते फेकून देण्याऐवजी ते लिलावकर्त्याकडे नेले.
येथील एका वृत्तपत्राच्याच्या रिपोर्टनुसार, ही महिला नॉर्थम्बरलँडमध्ये राहते आणि तिचे वय ७० वर्ष आहे. महिलेचे म्हणणे आहे की, तिला जितके आठवते, त्यानुसार तिने दागिन्यांसह कार बुथच्या विक्रीतून हिरा खरेदी केला होता. हिरा इतका मौल्यवान आहे, हे तिला अजिबात माहीत नव्हते. लग्नाच्या दागिन्यांसोबत हिराही घराच्या कोपºयात पडून होता. साफसफाई करताना महिलेने त्याला पाहिल्यानंतर ती लिलाव करणाºयाकडे घेऊन गेली. लिलाव करणाºयाने असेही सांगितले की, महिलेने या हिºयासोबत इतर काही दागिने बॅगेत आणले होते, जे तिला विकायचे होते. हिरे सोडले, तर इतर दागिन्यांची किंमत खूपच कमी होती.

या हिºयाच्या तपासणीअंती तो कृत्रिम हिºयासारखा दिसणारा क्युबिक झिरकोनिया असल्याचे आढळून आले आहे. लिलाव करणा‍ºयाने सांगितले की, त्याने चाचणीपूर्वी हिरा सामान्य मानला होता, परंतु चाचणीनंतर असे दिसून आले की, हा हिरा ३४ कॅरेटपेक्षा जास्त आहे. तो एक अत्यंत दुर्मीळ हिरा निघाला, महिलेची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …