सानिया, बोपन्ना पहिल्या फेरीत बाहेर

ॲडलेड -भारताचे अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांना दुसऱ्या ॲडलेड एटीपी आणि डब्ल्यूटीए स्पर्धेत मंगळवारी येथे आपापल्या जोडीदारांसह पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. सानिया आणि यूक्रेनची दुसरी क्रमवारी प्राप्त नादिया किचनोक ही जोडी डब्ल्यूटीए २५० स्पर्धेच्या पहिल्या फेरीत टेरेसा मार्टिनकोव्हा आणि मार्केटा वोंड्रोसोव्हा यांच्याकडून ६१ मिनिटांत ३-६, ३-६ ने पराभूत झाली. त्या मागील आठवड्यात उपांत्य फेरीत दाखल झाल्या होत्या. पुरुष दुहेरीमध्ये बोपन्ना आणि त्याचा फ्रेंच जोडीदार एडुआर्ड रोजर वेसलिन आपल्या पहिल्या फेरीतील मुकाबल्यात अमेरिके च्या स्टीव्ह जॉन्सन आणि ऑस्टिन क्रायसेक यांच्याकडून ६९ मिनिटांत ४-६, ६-३, ३-१० असे पराभूत झाले. बोपन्ना आणि रामकुमार रामनाथन यांनी गेल्या आठवड्यात एकत्रितपणे दुहेरी किताब जिंकला होता. बोपन्ना आणि सानिया आता या वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळतील.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …