ठळक बातम्या

सातारा : खंबाटकी बोगद्याजवळ विचित्र अपघात, एक ठार

सातारा – पुणे-बंगळुरू महामार्गावर साताऱ्याहून पुण्याकडे जात असताना खंबाटकी बोगद्यानजीक धोम बलकवडी कालव्याजवळील उतारावर दुचाकीस्वार घसरून पडला. त्यावेळी पाठीमागून येणारा मालट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. दुसरीकडे, याच परिसरात उतारावरून पुण्याकडे भरधाव वेगात जात असणाऱ्या मालट्रकने तीन गाड्यांना धडक दिल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले.

साताऱ्याहून पुण्याकडे जात असताना खंबाटकी बोगद्यानजीक धोम बलकवडी कालव्याजवळील उतारावर दुचाकीस्वार सचिन कैलास गिरमे हा घसरून पडला. त्यावेळी पाठीमागून येणारा मालट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत या अपघातातील दुचाकी पोलिसांनी रस्त्यावरून बाजूला घेत मृतास रुग्णवाहिकेमधून खंडाळा रुग्णालयात पाठवले. दोन्ही अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाले. दरम्यान, याच परिसरात उतारावरून भरधाव वेगात आलेला मालट्रकने डस्टर, क्रेटा व इर्टिका कारला धडक दिली. यामध्ये क्रेटा कारचा चक्काचूर झाला. खंडाळा व महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला केली. जखमी सहा जणांना उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले. दिवाळी सुट्टी संपल्याने पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी महामार्गावर आहे. अपघात स्थळापासून दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सर्व जखमी खराडी (पुणे) येथील आहेत. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. जखमी लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक युवकांनी मदत केली. अधिक तपास खंडाळा पोलीस करत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …