ठळक बातम्या

साखर कारखाने प्राप्तीकरातून मुक्त * केंद्र सरकारकडून कायद्यात दुरुस्ती

नवी दिल्ली – केंद्र सरकारने २०१६च्या कायद्यात बदल करीत साखर कारखानदारांना दिलासा दिला आहे. एफआरपीपेक्षा जास्त रकमेला नफा पकडला जात असल्याने साखर कारखानदारांना प्राप्तीकर भरणे भाग होते. आता त्यात स्टेट ऑथॉरिटी आणि इतर कायदेशीर मार्ग उपलब्ध करून देऊन केंद्राने दिलासा दिला आहे. साखर कारखान्यांकडून उसाला वाजवी व किफायतशीर दर (एफआरपी) किंवा किमान हमी भावापेक्षा (एसएमपी) जास्त दिलेला दर हा ऊस खरेदीचा खर्च समजावा व त्यावर प्राप्तीकर आकारू नये, असा कायद्यातील महत्त्वपूर्ण बदल केंद्र सरकारने केला आहे. या निर्णयामुळे साखर कारखान्यांची प्राप्तीकरातून सुटका झाली आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१६ पासून करण्यात येणार आहे. या निर्णयाने साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला असला, तरी २०१६ पूर्वीच्या यासंदर्भातील नोटिसाही मागे घेण्याची मागणी होत आहे. साखर उद्योगाकडून पूर्वी ‘एसएमपी’द्वारे उसाला पैसे दिले जात होते. हंगाम संपल्यानंतर काही कारखान्यांकडून सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षाही काही रक्कम ऊस उत्पादकांना दिली जात होती. प्राप्तीकर विभागाने मराठवाडा व विदर्भातील काही साखर कारखान्यांची पाहणी केल्यानंतर जादा दिलेली रक्कम ही कारखान्यांचा फायदा समजून त्यावर प्राप्तीकर आकारण्यात येऊ लागला. १९९२-९३ पासून याच पद्धतीने देशभरातील कारखान्यांना नोटिसा पाठवल्या जात होत्या. त्यातून ही रक्कम तीन हजार कोटींपुढे गेली आहे.
प्राप्तीकराच्या या कारवाईिवरोधात कारखान्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात दोनवेळा याचिका दाखल केली; पण त्यालाही यश आले नव्हते. दुसरीकडे प्राप्तीकर विभागाने पुन्हा या कराच्या वसुलीसाठी राज्यातील कारखान्यांना नोटिसा पाठवून या रकमेच्या वसुलीसाठी प्रसंगी कारखान्यांच्या मालमत्तेवर थकीत रकमेचा बोजा चढवून वसुलीचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर अलीकडेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन यासंदर्भातील वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …