ठळक बातम्या

साखर उद्योगाला दिलासा : अमेरिकेला ३०३ मेट्रिक टनांच्या निर्यातीस परवानगी

नवी दिल्ली – साखर उद्योगासाठी दिलासादायक बातमी आहे. टीक्यूआर अंतर्गत अमेरिकेला ३०३ मेट्रिक टन अतिरिक्त साखर निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. याबाबत ‘डीजीएफटी’कडून आदेश जारी करण्यात आला आहे. ही साखरेची निर्यात करमुक्त असणार आहे. गेल्या ऑक्टोबरपर्यंत भारताने अमेरिकेला ८,४२४ मेट्रिक टन साखर निर्यात केली आहे. यामध्ये आणखी आता ३०३ मेट्रिक टन साखरेची भर पडणार आहे. याचाच अर्थ असा की, येत्या डिसेंबर २०२१ पर्यंत भारत अमेरिकेला एकूण ८७२७ मेट्रिक टन साखरेची निर्यात करणार आहे.
देशातील साखरेचे अतिरिक्त उत्पादन निर्यात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या निर्णयाचा मोठा फायदा हा साखर उद्योगाला होणार आहे. अतिरिक्त उत्पादनाची निर्यात करण्यात आल्याने मागणी आणि पुरवठा समपातळीवर राहू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात साखरेचे भाव जैसे थे राहतील, त्यामुळे साखर कारखाने आणि ग्राहक दोघांनाही दिलासा मिळेल. एका अहवालानुसार यावर्षी भारतामध्ये ऊसाचे प्रमाण जास्त असल्याने सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.
दिवसेंदिवस प्रदुषणामध्ये वाढ होत आहे, तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे आता पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक इंधनाचा शोध घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांनी उसापासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मितीला सुरुवात केली आहे. उसापासून इथेनॉलची निर्मिती केली जात असल्यामुळे साखरेचे उत्पादन घटले आहे. परिणामी अनेक देशांना इतर देशांतून साखर आयात करावी लागत आहे. भारतामध्ये देखील उसापासून काही प्रमाणात इथेनॉल निर्मितीला सुरुवात झाली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …