सांता बनलेल्या भारती सिंगने पहिल्यांदाच फ्लाँट केला बेबी बम्प

लोकप्रिय कॉमेडियन भारतीय सिंग आॅनस्क्रिन असो की आॅफस्क्रिन, ती नेहमीच लोकांना मनमुराद हसवत आली आहे. तिच्या आयुष्यात आता एक खूप मोठा बदल होणार आहे.
कारण आता ती आई बनणार आहे. ती पुढील वर्षी आपल्या मुलाला जन्म देणार आहे. सध्या तरी भारती आपली प्रेग्नन्सी एंजॉय करत आहे. त्याचबरोबर तिचे कामही सुरू आहे.

त्याचबरोबर ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टीव्ह असते. भारतीने अलीकडेच पती हर्ष लिम्बाचिया सोबत आपला बेबी बम्प फ्लाँट करतानाचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टबरोबर
तिने चाहत्यांना मजेदार प्रश्नही विचारले आहेत.

या फोटोत भारती आणि हर्ष दोघे आहेत. भारती सांता बनली आहे आणि त्यात ती खूप क्युटही दिसत आहे. दोघांनी बेबी बम्पवर हाताने हार्ट सारखी आकृती बनवली आहे. इंस्टावर
अडीच लाखांहून अधिक लोकांनी ही पोस्ट लाइक केली आहे. हा फोटो शेअर करताना भारतीने विचारले आहे, सांता येणार की सांती?, आपल्याला काय वाटते? लवकर कमेंटमध्ये सांगा.

त्याच्यासोबत भारतीने हार्टचा इमोजीही बनवला आहे. भारतीच्या या पोस्टवर टीव्ही अ‍ॅक्टर करणवीर सिंग बोहराने कमेंट केले आहे, मला सेंटी हवीयं, तर अभिनेत्री आरती सिंगनेही
सेंटीची डिमांड केली आहे. अर्जुन बिजलानीलाही वाटते की, मुलगी व्हावी. भारती आणि हर्ष लवकरच हुनरबाज या नव्या शोमध्ये दिसून येणार आहेत. यामध्ये करण जौहर, मिथुन

चक्रवर्ती आणि परिणिती चोप्रा हेदेखील आहेत. हा शो लवकरच कलर्स वाहिनीवर सुरू होणार आहे. हा एक टॅलेंट रिअ‍ॅलिटी शो आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …