ठळक बातम्या

सांगलीत कारनेदिंडीला चिरडले ; तिघा भाविकांचा करुण अंत

सांगली – सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील महालिंगराया यात्रा व देवदर्शनासाठी पायी चाललेल्या कर्नाटकातील भाविकावर काळानेघाला घातला.कारचे टायर फुटून हा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघा भाविकांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या अपघातात बसवराज दुर्गाप्पा चिंचवडे (रा. मदभावी तालुका लिंगसूर जिल्हा रायचुर), नागप्­पा सोमांना आचनाळ (रा. देवभूसर तालुका लिंगसूर जिल्हा रायचूर) आणि म्हणप्पा दुर्गप्पा गोंदीकल अशी मृत्यू झालेल्या तिघा भाविकांची नावे आहेत. हुलजंती तालुका मंगळवेढा येथे दीपावलीच्या निमित्ताने महालिंगराया यात्रा मोठ्या प्रमाणात भरते या यात्रेसाठी कर्नाटकातील लोक मोठ्या प्रमाणात येत असतात.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या हुलजंती येथील महालिंगराया यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी कर्नाटकातील रायचूर येथून भाविकांचा गट पायी निघाला होता. पंढरपूर ते विजापूर महामार्गावर उमदीपासून दोन किलोमीटर अंतरावरील शेवाळे वस्ती येथे पुण्याहून कुटुंबियासह विजापूरकडे निघालेल्या पोलो चारचाकी कार (एम.एच १२ टह ८५९८) याचे अचानक टायर फुटल्याने मोटारसायकला धडक देत वाहन थेट आडवे होत भाविकांच्या दिंडीत घुसल्याने झालेल्या अपघातात तिघा भाविकांचा मृत्यू झाला. तर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी स.पो.नि. पंकज पवार यांनी तात्काळ भेट देत जखमींना रुग्णालयात हलविले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …