सहा महिन्यांत ‘फ्लेक्स फ्यूएल इंजिन’ अनिवार्य – नितीन गडकरी

नवी दिल्ली – आगामी काही काळातच सर्व प्रकारच्या वाहनांच्या इंजिनामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. येत्या सहा महिन्यांत प्रत्येक वाहनाला ‘फ्लेक्स फ्यूएल इंजिन’ अनिवार्य करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. फेडरेशन आॅफ ग्रीन एनर्जीच्या ‘ग्रीन एनर्जी अ‍ॅवॉर्ड’च्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अण्णासाहेब पाटील, केंद्रीय रसायन मंत्री भगवंत खुबा उपस्थित होते.
याप्रसंगी गडकरी म्हणाले की, इथेनॉल हे सर्वाधिक परवडणारे इंधन असून, इथेनॉल हे विमानातील इंधनासाठीही यशस्वी झाले आहे. एकापेक्षा अधिक इंधनावर चालणारे फ्लेक्स इंजिन आहे. वाहन निर्मिती करणाºया कंपन्यांना फ्लेक्स इंजिन बनविणे अनिवार्य करण्यात येणार आहे. येत्या ६ ते ८ महिन्यांत असे आदेश शासन जारी करणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता, पर्यायी इंधनाची गरज असून इथेनॉल, सीएनजी, बायो एलएनजी, इलेक्ट्रिक हे पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. या इंधनावर सर्वांना जावेच लागणार आहे. सरकारही या दिशेने काम करीत आहे. पेट्रोल, डिझेलची ८० टक्के आयात संपवून ती शून्य टक्क्यावर न्यायची आहे. कारण पर्यावरणाच्या दृष्टीने डिझेल अधिक घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. कच्च्या क्रूड तेलाची आयात थांबवायची असेल, तर हरित ऊर्जेला अधिक प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही काम करीत आहोत. यावेळी ना. गडकरी यांनी फेडरेशनच्या पदाधिकाºयांना विविध स्रोतांच्या माध्यमातून हरित ऊर्जेच्या क्षेत्रात अधिक संशोधन आणि काम करण्याच्या सूचना केल्या. या कार्यक्रमात हरित ऊर्जा क्षेत्रातील अनेक कंपन्यांना पारितोषिक देण्यात आले. महाराष्ट्राच्या महाजेनको या कंपनीलाही पुरस्कार देण्यात आला. याच कार्यक्रमात अण्णासाहेब पाटील लिखित मराठी पुस्तकाचे हिंदीत अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *