सहकार क्षेत्रातील पक्षपात मूकदर्शक बनून पाहणार नाही – अमित शहांचा इशारा

सहकार चळवळ मागे का पडली? हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले?
अहमदनगर – सहकार क्षेत्र पुढे नेण्याची गरज आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन सर्वांनी त्याचा विचार केला पाहिजे. राज्य सरकारांनीही त्याचेभान ठेवले पाहिजे, असं सांगतानाच सहकार क्षेत्रात जो पक्षपात होत आहे. त्यात मी मूकदर्शक बनून राहू शकत नाही. हा पक्षपात होऊ न देणं ही माझी जबाबदारी आहे. तेच सांगण्यासाठी मी आलो आहे, असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगितले. अहमदनगर येथील प्रवरानगरमध्येशनिवारी पहिली सहकार परिषद पार पडली. यावेळी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा बोलत होते. या प्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी सहकार क्षेत्रातील पक्षपातीपणा, हजारो कोटींचेघोटाळेआणि अनागोंदी कारभारावर जोरदार ताशेरे ओढलेतसेच राज्य सरकारला कानपिचक्याही दिल्या.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले, सहकार चळवळ मागेका पडली याचा अभ्यास केला पाहिजे. केवळ सरकारने मदत करून चालणार नाही. आपल्यातील दोषही आपण दूर केले पाहिजे. साखर कारखान्यांच्या समस्या राज्याच्या पातळीवर का सोडवल्या जात नाहीत. काहींच्या तर सोडवल्या जात आहेत. या समस्यांवर दिल्लीत का सुनावणी घ्यावी लागते, असं सांगतानाच मी सर्वांना सांगतो, मला सल्ला देण्यापेक्षा स्वत:मध्ये डोकावून पाहा. राजकारण बाजूला ठेवून सहकाराला पाहण्याची तुम्हाला अधिक गरज आहे. सहकार क्षेत्रात पक्षपात होत आहे. त्यामुळेमी हा पक्षपात मूकदर्शक बनून पाहू शकत नाही. तो दूर करणं माझी जबाबदारी आहे. तेच सांगण्यासाठी मी इथं आलो आहे. आपण सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून काम केलं पाहिजे.ही आपली जबाबदारी आहे. सहकाराकरिता काहीही मदत लागली तरी नरेंद्र मोदी सरकार २४ तास तुमच्या मदतीसाठी तयार आहे, असेआश्वासन देत माझ्याकडे समस्या आल्यास सहकार कोण चालवते ते पाहणार नाही. युनिट कसं चालंल आहे हे पाहीन. राज्य सरकारनेही तेच पाहावं, असेशहा म्हणाले.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पूर्वी जिल्हा बँकांचं जाळं होते. आज काय झालं कुठे गेल्या या बँका. घोटाळेका झाले. स्थिती काय आहे. केवळ तीनच उरल्या आहे. हजारो कोटीचेघोटाळे कसे झाले. हे काय रिझर्व्ह बँकेने केले का? ‘नाही नाही ना, रिझर्व्ह बँकेने केलेनाही. मी राजकीय भाष्य करायला आलो नाही, पण सहकारीता आंदोलनातील कार्यकर्त्यांना जरूर सांगेल सरकार तुमच्या सोबत आहे. मोदी तुमच्यासोबत आहे. सहकारीता आंदोलनावर अन्याय होणार नाही. पारदर्शकता आणली पाहिजे. व्यावसायिकता आणली पाहिजे. मुलांना सहकारीतेचा मंत्र शिकवून त्यांना या आंदोलनात सहभागी करयाला पाहिजे. नव्या नेतृत्वाकडेत्याची धुरा दिली तर पुढील ५० वर्ष ही चळवळ टिकून राहील.
केंद्रीय सहकारी मंत्री यांनी प्रवरानगर येथील भूमीचे वर्णन करताना , ही भूमी सहकारीता क्षेत्रात काशी एवढीच पवित्र आहे, असे म्हटले. त्याकाळात बाळासाहेब विखे पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांनी सहकाराची चळवळ रोवली. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांनी या भूमीत येऊन नतमस्तक व्हायला हवे. गुजरातमध्येही सहकार चळवळ सुरू झाली. अमूल हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. अमूलचा टर्न ओव्हर ५० हजार कोटींचा आहे. महाराष्ट्रात पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांनी राज्यात चळवळ उभी केली. मोदींनी सहकारीतासाठी सहकार मंत्रालय तयार केले. ७५ वर्ष कुणालाही असं मंत्रालय करावे असे वाटले नाही. सहकारीता आजही प्रासंगिक आहे. सबका साथ आणि सबका विकासचा मंत्र केवळ सहकारीतेतूनच होऊ शकतो हे माहीत आहे म्हणूनच मोदींनी हे मंत्रालय तयार केलं, असंही अमित शहा म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …