सलमान खानने त्याच्या लग्नाच्या अफवेवर दिले सडेतोड उत्तर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान आणि युलिया वंतूर २०१०मध्ये डब्लिनमध्ये पहिल्यांदा भेटले होते, जेव्हा कलाकार ‘बॉडीगार्ड’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले होते. तर काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा सलमान त्याचा भाऊ सोहेल खानच्या चित्रपटाच्या संदर्भात रोमानियाला गेला होता, तेव्हा त्याने युलियाची भेट घेतली होती. सलमान खान आणि युलिया वंतूर यांच्या नात्याबद्दल एकेकाळी अनेक बातम्या येत होत्या.
सलमान खान जितका त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहतो तितकाच तो त्याच्या लग्न आणि अफेअरबद्दलही राहतो. सलमान ५६ वर्षांचा झाला असला, तरी त्याच्या लग्नाची चर्चा सुरूच आहे. दबंग खानचे लग्न कधी होणार हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. एकेकाळी सलमान आणि युलिया वंतूरबद्दल अशी अफवा पसरली होती की, दोघांनीही गुपचूप लग्न केले आहे. चर्चा २०१६ सालची आहे, जेव्हा बातमी आली होती की, हे कलाकार लग्नासाठी तयार आहेत. जेव्हा ही बातमी दबंग खानपर्यंत पोहोचली, तेव्हा त्याने त्याचे खंडन केले आणि मी जेव्हा लग्न करेन तेव्हा जगाला सांगेन असे सांगितले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान आणि युलिया वंतूर यांची पहिली भेट २०१०मध्ये डब्लिनमध्ये झाली होती, जेव्हा अभिनेता ‘बॉडीगार्ड’च्या शूटिंगसाठी गेला होता. तर काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा सलमान त्याचा भाऊ सोहेल खानच्या चित्रपटाच्या संदर्भात रोमानियाला गेला होता, तेव्हा त्याने युलियाची भेट घेतली होती. युलिया वंतूरसोबतच्या लग्नाच्या अफवेवर बोलताना सलमान खान म्हणाला की, जसे तुम्ही स्वत: म्हणत आहात की ही केवळ अफवा आहे.
सलमान पुढे म्हणाला की, जर माझी एंगेजमेंट झाली असती किंवा मी लग्न केले असते, तर मी बातमी लीक होण्याची वाट पाहिली नसती. मी स्वत: याची घोषणा करेन, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असेल. थोडा वेळ मी गप्प बसेन. भूतकाळातील त्या स्टार्सप्रमाणे, ज्यांनी आपल्या पत्नीबद्दल कोणालाही सांगितले नाही की, यामुळे त्यांचे फॅन फॉलोइंग कमी होईल. मला माहीत आहे की, संपूर्ण देश माझ्यासाठी आनंदी असेल.

मुलाच्या प्रश्नावर सलमान खान गमतीने म्हणाला, ‘मला मूल हवे आहे, पण समस्या अशी आहे की आईही मुलासोबत येते. आईला टाळता येत असेल, तर दोन-तीन मुलं व्हायलाही माझी हरकत नाही. काही उपाय असेल, तर सांगा. गेल्या वर्षी लॉकडाऊनदरम्यान, युलिया वंतूर सलमान खानच्या कुटुंबासोबत त्याच्या पनवेल फार्महाऊसवर होती. सलमान खानच्या वाढदिवसालाही युलिया तिथे दिसली होती. पनवेलमध्ये सलमानच्या बर्थडे पार्टीच्या व्हिडीओमध्ये युलियाही इतर अनेक सेलिब्रिटींसोबत दिसली होती.
सलमान खान त्याच्या पनवेल फार्महाऊसवर असताना साप चावल्याची बातमी चर्चेत आली होती. मात्र, औषध घेतल्यानंतर अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सलमानने या घटनेबद्दल सांगितले होते की, ‘फार्महाऊसवर माझ्या खोलीत एक साप घुसला होता आणि मुले घाबरली होती, म्हणून मी त्याला काठीच्या मदतीने बाहेर काढले, नंतर हळूहळू माझ्या हातात आला. मग मी त्याला सोडवण्यासाठी दुसºया हाताने पकडले. माझ्या कर्मचा‍ºयांनी साप पाहिल्यावर त्यांना तो विषारी वाटला, त्यानंतर झालेल्या गोंधळात सापाने मला एकदा नव्हे, तर तीनदा चावा घेतला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …