ठळक बातम्या

सलमानने केली बजरंगी भाईजानच्या सिक्वलची घोषणा

सलमानच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपटांपैकी बजरंगी भाईजान ठरला आहे. चित्रपटाच्या स्टोरीलाइनपासून ते त्याच्या गाण्यांपर्यंत सर्वच गोष्टी प्रेक्षकांना भावल्या होत्या. आता भाईजानने आपल्या या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली आहे. ही खबर आल्यापासून सलमानच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. सलमानने आपल्या या आगामी चित्रपटाची घोषणा रविवारी आरआरआरच्या इव्हेंटमध्ये केली. यावेळी आरआरआरचे डायरेक्टर एसएस राजामौली आणि ॲक्टर ज्युनिअर एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट आणि निर्माता करण जौहर ही मंडळी उपस्थित होती. आरआरआरच्या इव्हेंटमध्ये बोलताना सलमान म्हणाला की, एसएस राजामौली यांच्या वडिलांनी त्याला त्याच्या करिअरमधील बेस्ट चित्रपट दिला आहे. त्यावेळी करण जौहरने सलमानला ‘तर आम्ही हे मानायचे का, की चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली आहे?’ अशी विचारणा केली असता तो म्हणाला ‘हां, करण’. अशापद्धतीने अतिशय साध्या अंदाजात सलमानने ‘बजरंगी भाईजान २’ ची घोषणा केली. बजरंगी भाईजानने बॉक्स ऑफिसवर तब्बल ३०० कोटींचा बिझनेस केला होता. बजरंगी भाईजान हा २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता व हा कबीर खानने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment