ठळक बातम्या

सलमानच्या मागे जेव्हा शेराने केली त्याची नक्कल

दबंग स्टार सलमान खानचा अंतिम : द फायनल ट्रूथ हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटासाठी सलमानच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतो आहे. ज्याचा अंदाज सोशल मीडियावरून येऊ शकेल. इतकेच नव्हे, तर सलमानचा बॉडीगार्ड शेरा देखील काही कमी जोशमध्ये नाही आहे. म्हणून तर या चित्रपटातील सलमानच्या व्यक्तिरेखेची नक्कल करण्याचा मोह शेराला आवरला नाही आणि तेही सलमानच्या मागे!

भाईजानने शेराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात शेरा सलमानच्या पाठीमागे अंतिम मधील एक डायलॉग बोलताना दिसून येतो आहे. हा डायलॉग अंतिममधील सलमानची व्यक्तिरेखा राजबीर सिंगचा आहे. शेराचा मोनोलॉग संपल्यानंतर सलमान त्याची मस्करी करताना दिसून येतो. मुळात या मोनोलॉगमध्ये एक ओळ येते, ज्यात म्हणायचे असते की यह सरदार…शेरा ही लाईन बोलताना मात्र आपले बोट सलमानच्या दिशेने करतो, परंतु सलमान त्याची चेष्टा करण्याच्या मूडमध्ये असल्याने तो शेराला म्हणतो की यह सरदार… असे बोलताना तू तुझे बोट नक्कीच स्वत:कडे केले असशील. त्यावर वरमून जाऊन शेरा म्हणतो,’नाही मालिक’ तसे पाहायला गेले तर शेरा आणि सलमान हे फार पूर्वीपासून एकत्र आहेत. शेरा हा सलमानचा सर्वात प्रामाणिक साथीदार आहे व सलमानच्या निकटवर्तीयांपैकी एक मानला जातो. शेरा एक सिक्युरिटी एजन्सी चालवतो. शेराला आदर देण्यासाठी सलमानने आपला चित्रपट बॉडीगार्डमध्ये त्याच्या सिक्युरिटी एजन्सीचा गणवेश नावासकट घातला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …