सलग ९ व्यांदा व्याज दर ‘जैसे थे’

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले असून, सलग ९ व्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने मॉनिटरी पॉलिसीमध्ये कोणताही बदल केला नाही. रेपो रेट ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे व्याज दरात कोणताही बदल होणार नाही. आरबीआयने व्याज दर स्थिर ठेवल्याने सध्या वर्षाला ६.५० टक्क्यांपर्यंत असलेले गृह कर्जाचे व्याज दर कायम राहण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे स्वस्त कर्जे मिळवण्यासाठी ग्राहकांना आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

अदृष्य शत्रू असलेल्या कोविडच्या संकटाशी सामना करण्यासाठी आपण आता चांगले तयार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आर्थिक वर्ष २०२१-२२च्या पहिल्या सहामाहीत जीडीपी हा १३.७ टक्क्यांनी वाढला आहे. महागाई दरदेखील चार टक्क्यांच्या आसपास राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. मागील २०२०-२१ मधील पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का बसला होता. आता या धक्क्यातून आपली अर्थव्यवस्था चांगलीच सावरली असल्याचे त्यांनी नमूद केले. रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणे म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाºया कर्ज दरात वाढ होणे, तर रेपो रेट कमी होणे म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणे. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला, तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाचे कर्जाचे दरही वाढवावे लागतात, तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …