ठळक बातम्या

सलग सातव्या दिवशी त्रिपुरामध्ये हिंसाचार सुरूच

आगरतळा – शुक्रवारी सलग सातव्या दिवशीही त्रिपुरामध्ये दंगल उसळली. हिंदुत्ववादी संघटनांनी अनेक मशिदी, मुस्लीम लोकांची घरे आणि दुकाने पेटवल्याचा आरोप होत आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये झालेल्या अल्पसंख्याक हिंदूंवरील हिंसाचारानंतर हे हल्ले सुरू झाले. त्रिपुरा राज्य आणि बांगलादेशची सीमा एक आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीदरम्यान एक मशीद आणि काही दुकानांची तोडफोड करण्यात आली आणि काही दुकाने पेटवण्यात आली. विरोधकांनी या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आहे.
बांगलादेशातील दुर्गापूजा मंडपांच्या तोडफोडीच्या अलीकडच्या घटनांनंतर त्रिपुरामध्ये दंगल सुरू झाली. बांगलादेशमध्ये जवळपास ७० अल्पसंख्याक हिंदूंच्या घरांवर हल्ले करण्यात आले. त्यानंतर त्रिपुरामधील हिंदू संघटनांनी मशिदी, मुस्लीम लोकांची घरे आणि दुकानांवर हल्ल्यांना सुरुवात केली.
२१ ऑक्टोबर रोजी बांगलादेशातील घटनांविरोधात गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथे विश्व हिंदू परिषद आणि हिंदू जागरण मंचाच्या कार्यकर्त्यांची रॅली झाली होती. या रॅलीमधील कार्यकर्त्यांची पोलिसांशी चकमक होऊन तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह १५ जण जखमी झाले होते. या घटनांनी त्रिपुरामधील संचारबंदीचे निर्बंध मोडले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीदरम्यान एक मशीद आणि काही दुकानांची तोडफोड करण्यात आली आणि काही दुकाने पेटवण्यात आली. उत्तर त्रिपुरामध्ये ही घटना घडली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment

  1. Pingback: Toy car pallets