सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलची दरवाढ कायम

मुंबई – सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला असून या वाढीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. लागोपाठ पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. रविवारी पेट्रोल-डिझेल प्रत्येकी ३५ पैशांनी महागलेआहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलीटर १०९.३५ रुपये झाले, तर डिझेल प्रति लीटर ९८.०७ रुपये झालेआहे, तर मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये विक्रम वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये पेट्रोल प्रतिलीटर ११५ रुपयांच्या पुढे गेलं आहे, तर डिझेलची किंमत प्रतिलीटर १०६.२३ रुपये झाली आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर १०९.७९ रुपये, तर डिझेलचे दर १०१.१९ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोल १०६.०४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १०३.२५ रुपये प्रति लिटरनं विकलेजात आहे.
आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल-डिझेल दरवाढीने उच्चांक गाठला आहे. महिनाभरात मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर ६.८२ रुपयांनी महागलेआहे. २ ऑक्टोबर रोजी मुंबईत पेट्रोलची किंमत प्रतिलीटर १०८.१८ रुपये होती. आज मुंबईत पेट्रोलची किंमत ११५ रुपयांच्या पुढे गेलेआहे. राज्यात पेट्रोल-डिझेलची सर्वाधिक किंमत परभणीमध्ये आहे.महाराष्ट्रातील प्रमुख शहरात पुण्यात पेट्रोल ११४.५८ रु, तर डिझेल १०४.०५ , परभणीत पेट्रोल ११८.२५ तर डिझेल १०७.५८, नागपूर मध्ये ११४.९८ रु पेट्रोल तर डिझेल १०४.४६ रुपये, औरंगाबादमध्ये११५.९४ तर डिझेल १०५.३५ रु., नाशिक ला ११४.६४ तर डिझेल १०४.०९, साताऱ्यात पेट्रोल ११६.१९ आणि डिझेल १०५.५९ असेदर दिसून आले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …