सलग दोन ॲशेस कसोटी गमावल्यानंतर रूट चिंतेत

एडिलेड – पहिल्या दोन ॲशेस कसोटीतील एकतर्फी पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट म्हणाला की, तो आपल्या संघातील फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागांबाबत चिंतेत आहे. रूट एडिलेडमध्ये दुसऱ्या कसोटीत २७५ धावांच्या पराभवानंतर असे म्हणाला की, चेंडूला योग्य दिशेने टाकणे, मोठी धावसंख्या रचणे व विकेट घेण्याची संधी निर्माण करावी लागेल. पहिल्या कसोटीत इंग्लंडला नऊ विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. रूट म्हणाला की, ड्रेसिंग रूममध्ये सर्व जण दु:खी आहेत. आम्ही आपल्या सर्व बेसिक्सवर खेळताना दिसत नाही. आम्हाला आपल्या कामगिरीत लवकर सुधारणा करावी लागेल. पुढील सामना म्हणजेच बॉक्सिंग डे कसोटी रविवारी मेलबर्नमध्ये सुरू होईल. इंग्लंडचा संघ २०१०-११ नंतर ऑस्ट्रेलियात एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. त्यांना येथे मागील दोन मालिकांत ५-० व ४-० असा पराभवाचा सामना करावा लागला. रूट म्हणाला की, मला विश्वास आहे की, आम्ही येथे कसोटी जिंकू शकतो व आम्ही त्याच इराद्याने मैदानात उतरू.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …