ठळक बातम्या

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण

मुंबई – शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय दबाव आणि देशांतर्गत घडामोडींमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा कायम ठेवल्याने निर्देशांक कोसळले. दिवसाखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६७७.७७ अंकांनी खाली येत ५९,३०६.९३ वर, तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८५.६० अंकांनी कोसळत १७,६७१.६५ वर पोहोचला.
आयपीओ बाजार तेजी असल्याने सध्या गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा बड्या कंपन्यांच्या आयपीओकडे वळविला आहे. त्यामुळे समभागांची विक्रीचा मारा कायम ठेवला आहे. त्याचबरोबर आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर होत असताना काही बड्या कंपन्यांनी निराशाजनक कामगिरी केल्याचे समोर आले आहे. त्याचाही परिणाम बाजारावर होत असून, अशा कंपन्यांच्या शेअर्सच्या विक्रीचा धडाका गुंतवणूकदारांनी लावला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील घसरणीचे सत्र सुरू राहिल्याने तो दबावसुद्धा कायम राहिला. युरोपीय केंद्रीय बँकेने महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेपो रेट कायम ठेवला आहे. त्याचे पडसाद म्हणून युरोपीय बाजारात घसरण दिसून येत आहे, तर दुसरीकडे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह पुढील आठवड्यात रेपो रेटबाबत निर्णय घेणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा स्वीकारला आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी समभागांच्या विक्रीचा जोर कायम ठेवल्याने घसरणीला अधिकच बळ मिळाले. केवळ ऑक्टोबर महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी जवळपास २० हजार कोटी रुपयांहून अधिक रकमचेच्या रोख्याची विक्री केली आहे. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार गुरुवारी विदेशी गुंतवणूकदारांनी ३,८१८.५१ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. शुक्रवारी बाजार सुरू होताच गुंतवणूकदारांनी खरेदीचा मारा सुरू केला, परंतु बाजारातील तेजी काही वेळातच संपुष्टात आली. ६० हजारांवर पोहोचलेला सेन्सेक्स पुन्हा खाली आला. ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान (आयटी), बँक, वित्तीय संस्थांच्या समभागांना घसरणीमुळे मोठा फटका बसला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …