सेंच्युरियन – दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार व प्रशासक अली बाकर यांच्या मते, भारताकडे मागील ३० वर्षांतील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे व त्याचमुळे ते तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयाच्या प्रबळ दावेदाराच्या रूपात सुरुवात करतील. दक्षिण आफ्रिकेचे त्या काही स्थानांपैकी एक आहे, जिथे भारताने अद्याप कसोटी मालिका जिंकलेली नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वातील संघ यंदा ती गोष्ट पूर्ण करण्यास वचनबद्ध असेल. एका स्थानिक वृत्तवाहिनीशी संवाद साधताना बाकर म्हणाले की, पहिला कसोटी सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जाईल, जे समुद्रसपाटीपासून पाच हजार फूट उंचावर व दुसरा सामना जोहान्सबर्गमध्ये जे समुद्रसपाटीपासून सहा हजार फूट उंचावर आहे. ते पुढे म्हणतात, या दोन्ही कसोटी मैदानात विविध प्रकारच्या भौगोलिक परिस्थिती तसेच वाँडरर्स व सुपर स्पोर्ट पार्कमध्ये वेगाने उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या साधारणपणे वेगवान गोलंदाजांच्या फायद्याच्या आहेत. बाकर म्हणतात की, भारतीय संघाकडे मागील ३० वर्षांतील सर्वात वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे. त्यामुळे भारत पहिल्या दोन कसोटीत विजयाचा प्रबळ दावेदाराच्या रूपात सुरुवात करेल. भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा व उमेश यादवचा समावेश आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …