सर्वोच्च न्यायालयाकडून राज कुंद्राला दिलासा

४ आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षण

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाकडून पॉर्नोग्राफी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज कुंद्राला चार आठवड्यांसाठी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. यासोबतच न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.
नोव्हेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पॉर्नोग्राफी व्हिडीओ प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्राचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्याविरोधात कुंद्राने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने कुंद्रासह अन्य सहा जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यामध्ये शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांच्या नावाचा समावेश आहे. या प्रकरणात उमेश कामत, सुवोजित चौधरी आणि सॅम अहमद हे तिघेही आरोपी आहेत. राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलैच्या रात्री अटक केली होती. ‘हॉटशॉट्स’ या ॲपवरून पॉर्नोग्राफीक चित्रपट वितरित केल्याचा आरोप राज कुंद्रा याच्यावर आहे. याप्रकरणी त्याची सप्टेंबर महिन्यात जामिनावर सुटका करण्यात आली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …