एक टक्के लोकांकडे २२ टक्के संपत्ती
नवी दिल्ली/पॅरिस – भारताच्या विकासाचे ढोल बडवले जात असताना दुसरीकडे चिंता वाढणारा अहवाल समोर आला आहे. सर्वाधिक विषमता असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. वर्ष २०२१ मध्ये भारतातील एक टक्का लोकांकडे राष्ट्रीय उत्पन्नातील २२ टक्के संपत्ती एकवटली असल्याचे समारे आले आहे. जागतिक विषमता अहवाल २०२२ या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी फ्रान्सचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेट्टी यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी सहकार्य केले आहे.
अहवालात म्हटले आहे की, भारतातील प्रौढ लोकसंख्येचे सरासरी राष्ट्रीय उत्पन्न २,०४,२०० रुपये आहे, तर तळातील स्तरातील (५० टक्के) लोकांचे उत्पन्न ५३,६१० रुपये आहे. लोकसंख्येतील १० टक्के लोकांचे उत्पन्न जवळपास २० पट (११,६६,५२० रुपये) अधिक आहे. अहवालानुसार, भारतातील १० टक्के लोकसंख्येकडे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५७ टक्के संपत्ती आहे, तर एक टक्के लोकसंख्येकडे २२ टक्के संपत्ती आहे. त्याच वेळी, तळातील ५० टक्के लोकसंख्येचा वाटा केवळ १३ टक्के असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारत हा मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता असलेला देश असल्याचे अहवालात म्हटले आहे. भारतात एका बाजूला गरीब असून, दुसऱ्या बाजूला काही श्रीमंत वर्ग आहे. भारतात लैंगिक असमानता असून, महिला कष्टकरी, कामकरी महिलांच्या उत्पन्नाचा वाटा हा १८ टक्के आहे. हे प्रमाण आशियापेक्षाही (चीन वगळता २१ टक्के) कमी आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …