ठळक बातम्या

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत १० वर्षांनंतर प्रथमच औरंगाबाद दौऱ्यावर

औरंगाबाद – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत गुरुवारपासून म्हणजेच ११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी २०११ मध्ये सरसंघचालकांनी औरंगाबादमध्ये तीन दिवसांचा मुक्काम केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच ते ५ दिवसांच्या मुक्कामासाठी शहरात येत आहेत. त्यामुळे स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी काळात संघटनात्मक कार्यासंबंधीच्या बैठकांचे आयोजन या काळात केले जाईल.

सरसंघचालक मोहन भागवत ११ नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील नर्सी येथील श्री संत नामदेव महाराजांचे व गुरुद्वाराचे दर्शन घेऊन संध्याकाळी औरंगाबादेत येतील. याच दिवशी संघाच्या नगर स्तरावरील कार्यकर्त्यांचा सहकुटुंब एकत्रिकीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात सरसंघचालक मोहन भागवत हे पर्यावरण, सामाजिक समरसता आणि कुटुंब प्रबोधन या विषयांवर स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. पुढील मुक्कामात सरसंघचालक १२, १३ आणि १४ रोजी संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी विविध बैठका घेतील. पहिल्या दोन दिवसांत प्रामुख्याने औरंगाबादमधील पूर्ण वेळ कार्य करणाऱ्या प्रचारकांच्या आणि प्रांत कार्यकारिणी मंडळाच्या बैठका आणि काही स्वयंसेवकांच्या भेटी घेणार आहेत. १४ नोव्हेंबर रोजी संघाच्या विविध संस्था, संघटनांची समन्वय बैठक होईल. यात सरसंघचालक कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करतील. १५ नोव्हेंबर रोजी ते विमानाने हैदराबाद मार्गे कोलकात्याला रवाना होतील.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …