नाशिक – राज्याचेउपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला. रोज कोण कोण बोलतात सरकार जाणार. सरकार जाणार म्हणणारेदेव पाण्यात ठेवून बसले आहेत, पण सरकारचेदुसरीकडेकाम सुरू असल्याचेअजित पवार यांनी म्हटले. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने, शरद पवार यांच्या मार्गदर्शनात सरकार पुढेजात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्ष काम करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. नाशिक येथील कळवण तालुक्यातील नाकोडे गावात विविध विकास कामाचे भूमिपूजन, उद्घाटन कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अजित पवार यांनी कोरोना, नाशिकमधील विकास कामांवर भाष्य केले. विकास कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. इतर जिल्ह्यात रस्त्याच्या कामात जास्त निधी दिला जातो. नाशिक जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.
सर्वांनाी लस घेणे आवश्यक असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. एक नवीन विषाणू जगात पसरत आहे. अधिक वेगाने हा विषाणू पसरत आहे. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआणि राजेश टोपे आढावा घेत आहेत. आरोग्य खात्याला साडेसात हजार कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती पवार यांनी दिली. दुबईतून दाम्पत्य पुण्यात आले. त्यातून चालकाला कोरोना झाला. त्यानंतर कोरोना सर्वत्र पसरला होता, अशी आठवण सांगताना त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.
बोगस भरतीप्रकरणी दोषींवर कारवाई होणार
महापालिकेत २३ गावांचा समावेश होताना ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस भरती झाल्याचे माझ्या कानावर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात काही चुकीचे झाले असेल, तर दुरुस्ती केली जाईल आणि कोणी दोषी आढळल्यास त्यावर कारवाईही केली जाईल, असे स्पष्ट संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. बोगस कर्मचारी भरती प्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्याची चौकशीही जोरदार सुरू आहे. मात्र, ही गती रोखण्यासाठी ग्रामसेवक, सरपंचासह पदाधिकारी आणि बड्या अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर ‘फिल्डिंग’ लावण्याची धडपड सुरू आहे. काहींनी तर थेट मंत्रालयही गाठले आहे. अजित पवार यांनीच आता कारवाईचे संकेत दिल्यामुळे यात हात ओले करणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे. त्यामुळे बोगस भरतीमध्ये सामील असणारे ग्रामपंचायत, सरपंच आणि जिल्हा परिषदेतील तत्कालीन अधिकाऱ्यांचे धाबे पुन्हा दणाणले आहेत.