ठळक बातम्या

सरकार अजूनही शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे -टिकैत

मुंबईतील महापंचायतीमध्ये केंद्रावर टीका
मुंबई – दिल्लीतल्या ऐतिहासिक वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनातील प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते राकेश टिकैत रविवारी मुंबईत आले आहेत. मुंबईत आझाद मैदानातील कार्यक्रमात बोलताना राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारवर पुन्हा जोरदार तोफ डागली. आझाद मैदानातील शेतकरी महापंचायतीमध्ये बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. वर्षभर चाललेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसमोर गुडघे टेकत तिन्ही कृ षी कायदे मागे घेतले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागत तिन्ही कृ षी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली, पण सरकार अजूनही शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी केला. सरकारचा उद्देश साफ नाही, सरकार शेतकऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही यावेळी टिकैत यांनी केला.
पालघरमधील आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचे काम सुरू असल्याचा, जंगले कापली जात असल्याचा आरोपही राकेश टिकैत यांनी केला. सरकार अजूनही शेतकऱ्यांना वेगवेगळी नावे देत आहे. आधी पंजाबींना खलिस्तानी म्हणाले, हरियाणातील शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाले, पण आपण रागाला न जाता एकजुटीने राहा, असे आवाहनही टिकैत यांनी शेतकऱ्यांना केले. आताचे पंतप्रधान आणि तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात २०११ सालच्या समितीच्या शिफारशी सरकारने लागू कराव्यात. हमीभाव कायदा सरकारने देशात लागू करावा, सरकारने शेतकऱ्यांसोबत संवाद साधावा, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले जात आहे, असे ते म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …