सरकारी कार्यालयांसाठी इलेक्ट्रिक वाहने- आदित्य ठाकरेंची घोषणा

मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांमुळे होणारं प्रदुषण रोखण्यासाठी नववर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्रसरकारनेमोठेपाऊल उचललेआहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन आणि प्रदूषण टाळण्यासाठी यापुढेसर्वसरकारी वाहनेइलेक्ट्रीक असणार आहेत, असेपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. या योजनेची १ एप्रिल २०२२ पासून अंमलबजावणी करण्यात येणार होती, पण आता १ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचेआदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत.
प्रदूषण कमी करण्याच्यादृष्टीने राज्य सरकारचा प्रयत्न सुरु आहे. चांगली व स्वच्छ वाहतूक तसेच नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारची बांधिलकी असणार आहे. १ जानेवारी २०२२ पासून सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिकांसाठी फक्त इलेक्ट्रिक वाहने खरेदी आणि भाड्याने घेण्याचा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे.
राज्य शासनाने इलेक्ट्रीक वाहनांबाबतचे धोरण जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या हॉटेल्सनी इलेक्ट्रीक वाहने आपल्या ताफ्यात वापरावीत, असे आवाहन केले आहे. २०२५ पर्यंत नवीन वाहन नोंदणीत १० टक्के हिस्सा इलेक्ट्रीक वाहनांचा असेल तसेच ही वाहने प्रदूषणविरहित असतील असे आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही म्हणाले होते. आता त्यांनी सर्व सरकारी कार्यालयांसाठी इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्याची घोषणा केली आहे. तसेच व्यावसायिक संकुल शासकीय कार्यालयात इलेक्ट्रीक वाहनांना १०० टक्के सुसज्ज असे पार्किंग दिले जाईल, असेही ठाकरे म्हणाले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …