पुणे – भारतीय फलंदाजीत दमदार कामगिरी करणारा ऋतुराज गायकवाडला ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली चषक टी-२० स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्राला एलीट ग्रुप ‘ए’मध्ये ठेवण्यात आले आहे व लीग गटात त्यांना आपला पहिला सामना लखनऊ मध्ये खेळायचा आहे. त्यांचा पहिला सामना तामिळनाडूशी होईल. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ऋतुराजसोबत नौशाद शेख उपकर्णधार असेल. कोलकाता नाइट रायडर्सचा राहुल त्रिपाठी आयपीएल फायनलमध्ये लागलेल्या दुखापतीतून सावरू शकलेला नाही, त्यामुळे त्याला संघात घेण्यात आलेले नाही. वरिष्ठ फलंदाज केदार जाधवचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघ पुढीलप्रमाणे
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), नौशाद शेख (उपकर्णधार), केदार जाधव, यश नाहर, अजीम काजी, रंजीत निकम, सत्यजीत बछाव, तरनजीत सिंग ढिल्लों, मुकेश चौधरी, आशा पालकर, मनोज इंगळे, प्रदीप दाधे, शमशुजामा काजी, स्वप्निल फुलपागर, दिव्यांग हिंगनेकर, सुनील यादव, धनराजसिंह परदेशी, स्वप्निल गुगळे, पवन शहा आणि जगदीश जोप.