मुंबई – नाकार्ेटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना त्यांच्या मालकीच्या नवी मुंबईतील बारप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोटीस बजावली आहे. १९९७ साली बारच्या परवान्यासाठी वानखेडेंकडून त्यांच्या जन्माच्या तारखेबाबत चुकीची माहिती दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
नवी मुंबई, वाशीतील सद्गुरू बार अँड रेस्टॉरंटच्या परवान्यासाठी १९९७ मध्ये वानखेडे यांनी केलेल्या अर्जात त्यांच्या वयाबद्दल चुकीची माहिती दिली होती, असे ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे म्हणणे आहे. वानखेडे यांना १९९७ मध्ये त्यांच्या रेस्टॉरंट आणि बारला परवाना देण्यात आला होता. त्यावेळी त्यांचे वय अवघे १७ वर्षे होते, तर ते मिळविण्यासाठी वय किमान २१ असावे लागते, असे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांना १५ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आल्यानंतर एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात मंत्री नवाब मलिक यांच्याकडून आरोपांची मालिका सुरू करण्यात आली होती. त्यात वानखेडे यांच्या मालकीच्या नवी मुंबईतील सद्गुरू बार ॲण्ड रेस्टॉरंटची माहितीदेखील पुढे आली होती. या तपासात ज्यावेळी बार परवाना वानखेडे यांच्या नावे घेण्यात आला, त्यावेळी वानखेडे यांचे वय केवळ १७ वर्षांचे होते, या परवान्यासाठी २१ वर्षे वय असावे लागते, असे सांगण्यात येत आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …