बॉलीवूड अभिनेत्रींच्या सुंदर फोटोंनी सोशल मीडिया दररोज भरलेले दिसून येते. कुणी बिकनीत तर कुणी मालदिव व्हेकेशन्सचे फोटो पोस्ट करत आपले सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु या सर्वांमध्ये समीरा रेड्डीने मात्र एक अशी पोस्ट केली आहे ज्यात शरीराचा सर्वात वाईट भाग दाखवण्यात आला आहे. समीराच्या धाडसाचे आणि प्रेरणादायी संदेशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
समीराने इंस्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती आपल्या हाताच्या वरील भागावर असलेले स्ट्रेच मार्क्स दाखवताना दिसून येते आहे. या फोटोबरोबर समीराने एक प्रेरणादायी मेसेज लिहून हा फोटो पोस्ट करण्यामागचा हेतू सांगितला. समीराने लिहिले,’आपल्या शरीराचा तो भाग निवडा, जो आपल्याला बिल्कुल आवडत नाही. त्या भागावर सर्वाधिक प्रेम करा आणि स्वीकार करा. आपले शरीर आपला सर्वात चांगला साथीदार आहे व त्याला तुमच्या प्रेमाची गरज आहे. एक सकारात्मक बॉडी इमेज बनवण्यासाठी ही साधी बॉडी पॉझिटीव्ह एक्सरसाईज ट्राय करा. जर आपल्याला शरीराचा तो भाग शेअर करण्यात अन्कफर्टेबल वाटत असेल, जो त्रासदायक वाटतो तर तो शेअर करा.’
समीराच्या या पोस्टवर खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. अनेक लोकांनी तिच्या साहसाचे कौतुक करत तिला प्रेरणादायी म्हटले आहे. एका फॉलोअरने म्हटले आहे,’समीरा तू मला परफेक्ट फिल करायला लावते. तुझ्यामुळे मी माझ्यातील दोष स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. मी आता दोषमुक्त झाले आहे. कारण दोषांमध्ये मला आता कोणतीही उणीव दिसत नाही.’ अनेक चाहत्यांनी समीराच्या पोस्टवर फायर इमोजी पाठवून तिच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे. ४२ वर्षीय समीरा त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या विचारातील दुनियेतून बाहेर पडत वास्तवात जगतात. समीराने २०१४ मध्ये व्यावसायिक अक्षय वर्देसोबत विवाह केला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.