ठळक बातम्या

सफेद दाढी…घरातील कपडे… नव्या लूकमुळे आमिर झाला ट्रोल

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट या नावाने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता आमिर खान हा नेहमीच चर्चेत असतो. कधी आपल्या हटक्या प्रोजेक्ट्समुळे तर कधी आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे. आताही आमिरचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. ज्यामुळे तो चर्चेचा विषय नाही तर ट्रोलिंगचे कारण ठरला आहे.

आमिरचे काही फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहे. आमिरचे हे फोटो बॉलीवूडचा लोकप्रिय फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोत आमिरचा लूक इतका बदललेला आहे की, ते पाहून लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. फोटोत पाहायला मिळत आहे की आमिरची दाढी तर वाढलेली आहेच परंतु त्याचबरोबर ती पूर्णपणे सफेद झाली आहे. आमिरच्या अनेक चाहत्यांनी तर आमिरला ओळखलेही नाही इतका त्याच्या लूकमध्ये बदल दिसून येतोयं. आमिरच्या संपूर्ण लूकबद्दल बोलायचे झाले तर तो एका कारमध्ये बसलेला असून त्याने पांढऱ्या रंगाचा टी शर्ट आणि लाल रंगाची हाफ पँट घातली आहे. त्याचबरोबर त्याने चेहऱ्यावर मास्कही लावलेला आहे. आमिरचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यावर त्याच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. आमिरचा हा लूकही त्याच्या काही चाहत्यांना आवडला आहे, तर काही चाहत्यांनी त्याला ओळखलेही नाहीयं. याशिवाय अनेक युजर्स त्याला त्याच्या वयावरून ट्रोल करतानाही दिसत आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आमिर सध्या आपल्या लाल सिंग चढ्ढा या चित्रपटात खूप बिझी आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …