सनी लिओनीच्या ‘मधुबन में राधिका नाचे’ गाण्यावर भडकले युझर्स

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीचे गाणे ‘बेबी डॉल मैं सोने दी’ हे गाणे तुम्ही आजवर अनेक लग्नांत किंवा पार्टीमध्ये ऐकले असेल. ज्या गाण्यांमुळे सनी लिओनी लाइमलाइटमध्ये आली त्या गाण्यांवर थिरकण्याचा मोहही तुम्हाला झाला असेल. मात्र सनीच्या नुकत्याच आलेल्या गाण्याबाबत मात्र काहीतरी विपरीतच घडले आहे. अलीकडेच सनी लिओनीचे नवे गाणे ‘मधुबन में राधिका नाचे’ रिलीज झाले आहे. सनीने या गाण्याचे जोरदार प्रमोशनही केले आहे, परंतु प्रत्यक्षात हे गाणे वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसतेय. मधुबन गाण्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक सनीला ट्रोल करू लागले आहेत. या गाण्यावर आक्षेप घेत युझर्सनी हे गाणे युट्यूबवर बॅन करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सनी लिओनीचे हे गाणे पाहिल्यानंतर धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप होत आहे. आता हे गाणे यूट्यूबवरून हटवण्यात यावे, अशी मागणीही केली जात आहे. सनी लिओनीने २२ डिसेंबर रोजी मधुबन गाण्याचा म्युझिक व्हिडीओ रिलीज होणार असल्याची माहिती आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली होती. त्यानंतर ज्या क्षणाला हे गाणे वेगाने व्हायरल झाले तेव्हापासूनच लोकांनी या गाण्यावरून सनीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या गाण्याविषयी लोकांचे म्हणणे आहे की, सनी ज्याप्रकारे या गाण्यात डान्स करत आहे, ते गाण्याच्या बोलांच्या तुलनेत खूप आक्षेपार्ह आहे. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे लोकांनी या गाण्यावर बंदी घालण्याची मागणीही केली आहे.

या गाण्याद्वारे सनी लिओनी आणि कनिका कपूर या दोघी पुन्हा एकदा एकत्र आल्या आहेत. यापूर्वी या दोघी बेबी डॉल या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळाल्या होत्या. मधुबन एक डान्स ट्रॅक गाणे असून, हिंदी सिनेमातील प्रख्यात कोरिओग्राफर गणेश आचार्यने हे गाणे कोरिओग्राफ केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …