मुंबई – दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या भावात पुन्हा उसळी पाहायला मिळेल, हा जाणकारांचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दरात सातत्याने वाढ दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजपेक्षा स्थानिक बाजारपेठांमध्ये प्रत्यक्ष सोन्याचे दागिने खरेदी करताना ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. सोन्याच्या प्रतितोळा दरात जीएसटी आणि घडणावळीची भर पडत असल्याने ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे. मुंबईत दिवाळीपासून म्हणजे ५ नोव्हेंबरपासून स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारीही सोन्याच्या प्रतितोळा दरात ३७० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याच्या खरेदीसाठी जवळपास ५०,३७० रुपये मोजावे लागत होते, तर चांदीचा प्रतिकिलो दर ६८,५३० रुपये इतका होता.
पुण्यात गेल्या आठडाभरात सोन्याच्या दरात जवळपास १६०० रुपयांनी वाढ झाली आहे. पुण्यातील सराफ बाजारात सोन्याचा प्रतितोळा दर ५०,३७० रुपये इतका नोंदवण्यात आला. नागपुरातही सोन्या-चांदीच्या भावात वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी नागपुरात सोने ५०,३७० रुपये प्रतितोळा होते. गुरुवारी हाच भाव ५० हजार रुपये प्रतितोळा होता. चांदीचा भाव शुक्रवारी ५८ हजार ५३० रुपये होता. तर गुरुवारी ६७ हजार ६०० रुपये होता. जळगाव आणि नाशिकमध्येही सोन्याचा प्रतितोळा दर ५०,३७० रुपये इतका होता. तर औरंगाबादमध्ये १० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी ५०,३४० रुपये मोजावे लागत होते.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …