ठळक बातम्या

सचिनची नवी ‘इनिंग’; कार कंपनीत सह-भागीदारी!

मुंबई – क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती पत्करलेल्या सचिन तेंडुलकरने उद्योग विश्वात पाऊल टाकले आहे. जुन्या कारच्या विक्री व्यवहारात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या ‘स्पिनी’ या कंपनीसोबत सचिनने नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. ‘स्पिनी’ कंपनीसोबत सचिनने सह-भागीदारी स्वीकारली आहे. मात्र, या कं पनीतील त्याच्या गुंतवणुकीचा आकडा अद्याप गुलदस्त्यातच आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनंतर ‘स्पिनी’सोबत भागीदारी करणारा सचिन दुसरा खेळाडू ठरला आहे.
‘स्पिनी’ने याविषयीचे अधिकृ त पत्रक जारी केले आहे. सचिन ‘स्पिनी’चा गुंतवणूक रणनीतीकार म्हणून कार्यरत असणार आहे. जागतिक स्तरावरून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सचिनची भूमिका असणार आहे. ‘स्पिनी’चे संस्थापक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज सिंह यांनी ‘स्पिनी’सोबतच्या सचिनच्या सह-भागीदारीला दुजोरा दिला आहे. भारत हा युवकांचा देश आहे. युवकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतातील उद्योजक प्रयत्नशील असल्याचे सचिनने कारारानंतर म्हटले आहे.
स्पिनी कंपनीच्या वर्तमान गुंतवणुकदारांत फिरोज दिवाण, एरिना होल्डिंग्स आणि थिंक इन्व्हेस्टमेंट्चा समावेश होतो. ‘स्पिनी’चे सध्या १५ शहरांत २३ कार हब कार्यरत आहेत. भारतात हजारो जुन्या कारच्या विक्रीचे व्यवहार केले जातात. ऑफलाइन किंवा पारंपरिक खरेदी मार्गाने अधिक वेळ लागतो. ‘स्पिनी’ने ग्राहकांना जुन्या कारचे एकापेक्षा अधिक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही मध्यस्थीविना थेट जुन्या कारची जोखीमरहित खरेदी करणे शक्य ठरले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …