अलिबाग – मराठा आरक्षणासाठी रायगड ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे. याबाबत खासदार संभाजी राजे यांनी इशारा दिला आहे. संभाजी राजे यांनी रायगडमधून जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. मराठा समाजाने लाँग मार्चच्या तयारीला लागावे, असे आवाहन संभाजी राजे यांनी केले. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांवर सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. या सरकारला जागे करण्यासाठी आता मराठा समाजाने पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्याची तयारी करावी, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षण जनसंवाद दौरा हा रायगड जिल्ह्यातून करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा मराठा आरक्षण जनसंवाद दौºयास उत्साहात सुरुवात केली. खोपोली येथे संभाजी राजे यांचे स्वागत केले, तसेच पळसदरी येथे तरुणाईसह माता-भगिनींनी अत्यंत उत्साहात स्वागत केले, तर मराठा आरक्षण जनसंवाद दौºयात खोपोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून संभाजी राजे यांनी अभिवादन केले. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी आरक्षण देत असताना ठेवलेला व्यापक दृष्टिकोन ध्यानी घेऊनच डॉ. बाबासाहेबांनी भारताच्या राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद केली, अशी माहिती संभाजी राजे यांनी दिली.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …