संप मागे नाहीच : एसटी आंदोलक कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम

मुंबई – राज्य सरकारकडून एसटी कर्मचाºयांच्या वेतनवाढीबाबत निर्णय घेतल्यानंतर मागील काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन संपुष्टात येईल असे वाटत होते, मात्र एसटी आंदोलक कर्मचाºयांनी सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे़ आझाद मैदानावरील एसटी आंदोलक कर्मचारी संप मागे घ्यायला तयार नाहीत. विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, राज्य सरकारने दिलेली वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. एसटी कामगारांनी उभारलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे, मात्र पुढील निर्णय कामगारांनी घ्यावा, असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले.
गेल्या १५ दिवसांपासून एसटी महामंडळाच्या विलिनीकरणासाठी एसटी कर्मचाºयांनी आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे़ हा संप मिटवण्यासाठी शासनच्या पातळीवर सर्वतो प्रयत्न केले गेले, मात्र सरकारने दिलेला वेतन वाढीचा प्रस्ताव अमान्य असल्याचे सांगत आझाद मैदानावरील ही लढाई अशीच सुरू राहणार असल्याचे एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाºयांनी सांगितले आहे. दुसरीकडे, एसटी प्रशासनाकडून कर्मचाºयांना दोन दिवसांचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. पुढील दोन दिवसांत कामावर रुजू व्हा, नाहीतर परवापासून निलंबित कर्मचाºयांवर कायमस्वरूपी बडतर्फीची कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे. सरकारने दिलेल्या कारवाईच्या इशाºयाचाही आंदोलक कर्मचाºयांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही़ सरकारच्या धमकीला भीक न घालता आंदोलक आपल्या मागणी वर ठाम आहेत़

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …