संपकरी एसटी कर्मचाºयांना कामगार न्यायालयाचा दणका:बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती देण्यास दिला नकार

 


मुंबई – संपकरी एसटी कर्मचाºयांना कामगार न्यायालयाने दणका दिला आहे. कामगार न्यायालयाने एसटी कर्मचाºयांवरील बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिलाय. यामुळे एसटी कर्मचाºयांच्या अडचणी आणखीच वाढल्या असल्याचे दिसते आहे.

गेल्या २ महिन्यांपासून एसटी कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. यामुळे परिवहन खात्याने अनेकदा सूचना देऊनही एसटी कर्मचाºयांनी ऐकले नसल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. यामध्ये जवळपास १० हजारांपेक्षा जास्त एसटी कर्मचाºयांच्या निलंबनाची कारवाई केली आहे, तर जवळपास अडीच हजार एसटी कर्मचाºयांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. यासोबतच अनेक संपकरी एसटी कर्मचाºयांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे. संपामध्ये सहभागी झालेल्या कामगारांना महामंडळाकडून बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या बडतर्फीच्या कारवाईविरोधात काही कर्मचाºयांनी स्थानिक कामगार न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी निकाल देताना लातूर आणि यवतमाळ येथील कामगारांना न्यायालयाने एसटी महामंडळाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर महामंडळाकडून संबंधित ९ कामगारांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …