संजय लीला भन्साळींनी सुरू केले सलमानच्या डॉक्युमेंट्रीचे शूटिंग

 

सलमान खान स्वत:वर एक डॉक्युमेंट्री बनवणार आहे, हे तर आता सर्वांनाच ठाऊक आहे. बियाँड द स्टार नावाच्या या सीरिजमध्ये सलमानच्या जवळच्या ३० व्यक्ती त्याच्याविषयी सांगणार आहेत. या संपूर्ण सीरिजचे फॉर्मेट मुलाखतीच्या रूपात असेल, जेथे सलमान खानच्या निकटची मित्रमंडळी, दिग्दर्शक, निर्माता आणि सहकलाकार त्याच्याबद्दल सांगताना दिसून येतील. हे सर्व लोक मिळून सलमानच्या करिअरच्या ३० वर्षांवर बोलणार आहेत.

आता सलमान खानच्या करिअरबद्दल बोलले जात असेल, तर त्यावेळी संजय भन्साळी यांचा उल्लेख होणार नाही, असे होणार नाही. तर आता संजय भन्साळी यांनी आपल्या मनातील सर्व नाराजी दूर ठेवत या सीरिजकरिता आपल्या हिश्याचे शूटिंग पूर्ण केले आहे, तसेच सलमानबरोबर आपली मैत्री आणि मतभेदांच्या कथाही शेअर केल्या आहेत.
२०२०मध्ये सलमान खान आणि संजय भन्साळी हे हम दिल दे चुके सनमच्या २१ वर्षांनंतर एकत्र इंशाअल्लाह नावाच्या चित्रपटात एकत्र दिसून येणार होते, परंतु दरवेळेप्रमाणे या दोघांत मतभेद झाले आणि जाहीर होऊनही हा चित्रपट बासनात गुंडाळला गेला. असे असूनही भन्साळी यांनी सलमानच्या डॉक्युमेंट्रीकरिता मुलाखत देताना कोणतीही नाराजगी दाखवली नाही. आता पाहायचे हे आहे की, या वेबसीरिजद्वारे सलमानच्या आयुष्यातील कोणकोणती गुपिते उघड होतात ते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …