ठळक बातम्या

संजय राऊत म्हणतात, चु…आहेत ते लोक

 

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी रात्री उशिरा अटक झाली. आता अनिल परब यांचा नंबर आहे, असे विरोधक म्हणत आहेत. विरोधकांच्या या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. माझ्याच भाषेत बोलायचं तर चु… लोकं आहेत ते. चु… असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना हा संताप व्यक्त केला. माझ्या भाषेत बोलायचे झाले तर चु… आहेत ते लोकं. चु… असा शब्द बाळासाहेबांनीही अनेकदा वापरला आहे. चु…चा अर्थ मूर्ख असा आहे. तुम्ही कोण आहात? याला त्याला अटक करायला तुमच्या बापाची केंद्रीय तपास यंत्रणा आहे का?, असा संतप्त सवाल करतानाच तुम्ही स्वत:ला सांभाळा. तुम्हाला कधी अटक होईल या तारखा आम्हालाही माहीत आहेत; पण आम्ही या पातळीवर उतरायचे का? असा सवाल राऊत यांनी केला. आम्ही या पातळीवर उतरणार नाही. आम्हाला महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपायची आहे. बोंबलणारे लोक बाहेरचे आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार हे मूळचे लोकं आहेत. त्यांना आम्ही उत्तर देऊ ना. हे हौशे गवशे, नाचे बाहेरून आले आणि भाजपचा झेंडा फडकवून आम्हाला दाखवत आहेत. त्यांना काय माहीत आहे भाजप? आम्ही अटलजी, अडवाणी, मुरली मनोहर जोशींसोबत काम केलेले लोकं आहोत. आमचा भाजपशी जुना संबंध आहे. तुम्ही कधी आलात भाजपमध्ये? आयुष्यभर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या पायाखाली वाहिल्या. इकडून तिकडे करत असतात. तुम्ही भाजपबद्दल सांगू नका. आम्हाला भाजप आणि संघ काय हे सांगू नका. उद्या भाजपचं सरकार नसेल, तेव्हा तुम्ही त्या पक्षात नसाल. उद्या केंद्रातील भाजपचं सरकार गेल्यावर यातील एकही जण भाजपमध्ये नसेल, असा दावाही त्यांनी केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …