संजय राऊतांच्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव

  •  ४ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एकूण ४ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. खासदार संजय राऊत गोवा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. तर कुटुंबात आई, मुलगी, पत्नी आणि पुतणीला कोरोनाची लागण झाली आहे. संजय राऊतांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राऊत यांच्या घरातील सदस्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली असून, त्यांची प्रकृती उत्तम आहे. संजय राऊत बैठकांना हजर राहिले होते, तसेच घरगुती कार्यक्रमादरम्यान सदस्यांचा अनेक लोकांशी संपर्क झाला आहे. यामुळे कोरोनाची लागण झाली आहे. संजय राऊत गोवा दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली नाही.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …