श्वेता तिवारीने शेअर केला मुलीच्या म्युझिक व्हिडीओचा फर्स्ट लूक

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही आपल्या बोल्ड लूकने सोशल मीडियावर चांगलाच धमाका करताना दिसून येते. तिचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो युजर्सना थक्क करायला लावणारे असतात. अलीकडेच पलकने रोजी : द सॅफरन चॅप्टरद्वारे बॉलीवूडमध्ये आपला डेब्यू केला आहे. आता तिला घेऊन एका नव्या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे. श्वेताने याबद्दलची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे दिली आहे. त्याचबरोबर तिने पलकचा धमाकेदार फर्स्ट लूकही शेअर केला आहे.

श्वेता तिवारीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पलक तिवारी हिच्याशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने पलकच्या पहिल्या म्युझिक व्हिडीओची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये श्वेताने पलकचा एक फोटोही शेअर केला आहे. जो तिच्या आगामी म्युझिक व्हिडीओचा फर्स्ट लूक आहे. या फोटोत पलक काळ्या रंगाच्या फंकी आऊटफिटमध्ये दिसत आहे. त्यात ती नेहमीप्रमाणेच खूप स्टायलिश वाटत आहे. तिचा फर्स्ट लूक पाहून हे स्पष्ट होतेय की तिचे पहिले प्रोजेक्ट खूप धमाकेदार होणार आहे. ही पोस्ट शेअर करताना श्वेताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘गर्वाचा क्षण! ओह माय गॉड! अखेरीस वेळ आली आहे, पलक तिवारीच्या एका लूकचा खुलासा करण्याची. तिच्या पहिल्या म्युझिक व्हिडीओद्वारे.’ या गाण्याचे टायटल बिजली बिजली असून हार्डी संधू, जानी आणि बी प्राक यांचे हे गाणे येत्या ३० ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …