ठळक बातम्या

श्रेयसने रचला इतिहास : कसोटी पदार्पणातच झळकावले शतक

कानपूर – येथील ग्रीनपार्क मैदानावर सुरू असलेल्या भारत-विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा खेळाडू श्रेयस अय्यरने कसोटी पदार्पणातच इतिहास रचत शतक झळकावले. या खेळीत श्रेयस अय्यरने १२ चौकार आणि २ षटकार लगावले. शतक झळकावत श्रेयस अय्यरने कर्णधार अजिंक्य रहाणे याचा विश्वास सार्थ ठरवला आहे. श्रेयस अय्यर १०५ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरच्या शतकाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पदार्पणातच शतक झळकावणारा तो भारताचा १६ वा खेळाडू ठरला आहे. श्रेयसने गेल्या दोन वर्षांपासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेले नाही. मोठ्या कालावधीनंतर प्रथमच रेड बॉलचा सामना करणाऱ्या श्रेयस अय्यरने शतक झळकावत टीम इंडियाच्या डावाला आधार दिला. त्याने १५७ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. कानपूरच्या मैदानावर पदार्पणात शतक झळकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. १९६९ मध्ये गुंडाप्पा विश्वनाथ यांनी येथे शतक झळकावले होते. विश्वनाथ यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते.
न्यूझीलंड विरोधात पदार्पणात शतक झळकवणारा श्रेयस अय्यर हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. एजी कृ पाल सिंह यांनी नोव्हेंबर १९५५ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध १०० धावा केल्या होत्या. तो सामना हैदराबादमध्ये झाला होता. तर, सुरिंदर अमरनाथ यांनी ऑकलंडच्या ईडन पार्कमध्ये जानेवारी १९७६ मध्ये पदार्पणात शतक के ले होते. त्यानंतर तब्बल ४५ वर्षांनंतर एखाद्या भारतीय खेळाडूने न्यूझीलंड विरुद्ध पदार्पणात शतक केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …