ठळक बातम्या

‘शेरनी’, ‘सरदार उधम सिंग’ ‘ऑस्कर’वारीला?

नवी दिल्ली – पुढील वर्षी २७ मार्च, २०२२ रोजी ९४व्या अकादमी पुरस्कारांचे (ऑस्कर) आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी भारतीय चित्रपटातील अनेक चित्रपट ऑस्करसाठी नामांकित केले जातात. यावेळी विद्या बालन अभिनीत ‘शेरनी’ आणि विकी कौशल अभिनीत ‘सरदार उधम सिंग’ हे दोन चित्रपट ‘ऑस्कर २०२२’साठी नामांकित झाले आहेत. दोन्ही चित्रपटांचे कलाकार यानिमित्ताने आनंद व्यक्त करीत आहेत. त्याचबरोबर त्यांचे चाहते आणि इतर स्टार्सही त्यांचे अभिनंदन करत आहेत.
दरवर्षी ज्युरी ऑस्करसाठी अनेक चित्रपटांची निवड करते. ज्युरीने भारतीय चित्रपटांमधून १४ चित्रपटांची निवड केली आहे. यापैकी फक्त एक अंतिम प्रवेशामध्ये समाविष्ट केला जाईल. या १४ चित्रपटांमध्ये मल्याळम चित्रपट ‘नायतू’, तामीळ चित्रपट ‘मंडेला’, विद्या बालनचा हिंदी चित्रपटांमधील ‘शेरनी’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंग’ यांचा समावेश आहे.
परदेशी श्रेणीतील सर्वात मोठे दावेदार मानले जाणारे चित्रपट म्हणजे विद्या बालनचा ‘शेरनी’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला विकी कौशलचा चित्रपट ‘सरदार उधम सिंग’. अमित व्ही. मसूरकर दिग्दर्शित ‘शेरनी’ चित्रपटात विद्या बालन एका वन अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे, जी मनुष्यभक्षक वाघाला पकडण्याचा प्रयत्न करते. ‘सरदार उधम’ चित्रपटात विकी कौशल क्रांतिकारी सरदार उधम सिंग या भूमिकेत आहे. १९१९च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून एका ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या झाडणाऱ्या एका क्रांतिकारकाची ही कथा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शुजित सरकार यांनी केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *