ठळक बातम्या

शेफाली-कीर्ती अभिनीत ‘ह्युमन’ १४ जानेवारीला डिस्नी प्लस हॉटस्टारवर

 

वैद्यकीय जगताची काळी गुपिते समोर येतील तेव्हा धाडसी मनुष्य सत्याचा उलगडा करण्यासाठी जिवंत राहील की, खोटेपणा आणि फसवणुकीच्या धोकादायक जाळ्यात अडकेल? या वर्षात एका पाठोपाठ एक स्पेशल आॅप्स १.५, आर्या २, नोव्हेंबर स्टोरी आणि यांसारखे अनेक यशस्वी शो दिल्यानंतर, डिज्नी प्लस हॉटस्टारने २०२२ च्या सुरुवातीला भारतात मानवी औषधांच्या चाचणीवर आधारित थ्रिलर ‘ह्युमन’ लाँच करून दणक्यात सुरुवात केली आहे. या सीरिजमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री शेफाली शाह आणि अष्टपैलू अभिनेत्री कीर्ती कुल्हारी यांच्यासह विशाल जेठवा, राम कपूर, सीमा बिस्वास, संदीप कुलकर्णी, आदित्य श्रीवास्तव आणि मोहन आगाशे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सस्पेन्स थ्रिलर ‘ह्युमन’मध्ये वैद्यकीय जगताची अनपेक्षित रहस्ये आणि खून, गूढता, वासना आणि हेराफेरी याची चित्तथरारक कथा असून त्याचे मानवी आयुष्यावर होणारे परिणाम उलगडून दाखवण्यात आले आहेत. विपुल अमृतलाल शाह आणि मोजेझ सिंग दिग्दर्शित, डिज्नी प्लस हॉटस्टार विशेष मालिका मोजेझ सिंग आणि इशानी बॅनर्जी यांनी लिहिली आहे. सनशाईन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे विपुल अमृतलाल शाह निर्मित आगामी वैद्यकीय थ्रिलर नाट्य १४ जानेवारी २०२२ रोजी रिलीज होणार आहे आणि ते हुलू अ‍ॅपवर देखील उपलब्ध असेल.
या मालिकेत डॉ. गौरी नाथ यांची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शेफाली शाह सांगते की, सीरिज म्हणून ‘ह्युमन’ ही आजच्या काळाशी संबंधित आणि अत्यंत समर्पक विषय आहे. जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली, तेव्हा मी आपल्या सध्याच्या परिस्थितीची, रुग्णालये आणि लस चाचण्यांच्या जगाची कल्पना करत होते. हे मानवतेवर आणि ते अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. गौरी नाथ अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला क्वचितच भेटली असेल. हे मी आतापर्यंत साकारलेल्या सर्वात जटिल पात्रांपैकी एक आहे आणि माझ्या कम्फर्ट झोनच्या पलीकडची आहे. ती अप्रत्याशित आहे. ‘ह्युमन’ ही भावना, कृती आणि परिणामांचा पेटारा आहे आणि त्याचा गुंतागुंतीचा खोलवर कसा परिणाम होतो हे आपल्याला कधीच कळू शकणार नाही.

आर्थिक फायद्यासाठी फास्ट-ट्रॅक केलेल्या औषधांच्या चाचण्यांवर बेतलेली ही काल्पनिक सीरिज एक मनोरंजक कथा मांडते. ज्यामध्ये एखाद्याच्या लोभामुळे निष्पाप जीव गमावले जातात. मानवी जीवनाचे मूल्य, वैद्यकीय गैरव्यवहार, वर्गविभाजन आणि वेगवान वैद्यकीय शास्त्राचे परिणाम यांसारख्या विषयांना स्पर्श करून, ‘ह्युमन’ सत्ता संघर्ष, गुप्त भूतकाळ, आघात आणि खून इत्यादींच्या आकर्षक कथेत पैसे कमावण्याच्या लोभाला उलगडत जाते.
……………………………………………………………………………………..

‘स्वर्ण स्वर भारत’ चा प्रेक्षकांवर सखोल प्रभाव पडेल! – स्वामी रामदेव
रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात नवा ट्रेंड स्थापन करणारी आणि अशा कार्यक्रमात अनेक गोष्टी प्रथम साध्य करण्याबद्दल प्रसिद्ध असलेली ‘झी टीव्ही’ वाहिनी आता ‘स्वर्ण स्वर भारत’ हा प्रथमच भक्तिसंगिताला वाहिलेला रिअ‍ॅलिटी कार्यक्रम सादर करणार आहे. या कार्यक्रमातून आपला मूळ इतिहास सांगणाºया कथा, श्लोक आणि भक्तिसंगीताद्वारे प्राचीन मूल्यांचे दर्शन घडविले जाणार आहे. ‘फॅदम पिक्चर्स’ आणि ‘कैलास एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड’ यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘स्वर्ण स्वर भारत’ म्हणजे ‘झी टीव्ही’ वाहिनीतर्फे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आझादी का अमृत महोत्सव- भारताच्या स्वातंर्त्याची ७५ वर्षे’ या उदात्त उपक्रमात केलेले विनम्र योगदान आहे. त्याद्वारे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उत्सव जगभर साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात नामवंत कवी डॉ. कुमार विश्वास तसेच पद्मश्री कैलास खेर आणि पद्मश्री सुरेश वाडकर हे नामवंत पार्श्वगायक परीक्षक म्हणून काम पाहतील, तसेच सूर, भाव आणि सार या निकषांवर यातील स्पर्धकांच्या गाण्यांचे मूल्यमापन करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेते रवि किशन करणार आहेत.

या कार्यक्रमाचे प्रसारण होण्यापूर्वीच देशात त्याची चर्चा सुरू झाली असून या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या एका भागात योगगुरू स्वामी रामदेव हे विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात त्यांनी आगामी वर्षामध्ये भारत कसा अधिक बलवान देश होईल, यावर भाषण दिले. भारतीय संस्कृती आणि भारतीय संगिताचे मूळ यावर त्यांनी व्यक्त केलेल्या दृष्टिकोनामुळे अनेकांचे डोळे उघडतील.
या कार्यक्रमात आपले विचार मांडताना स्वामी रामदेव म्हणाले, या कार्यक्रमाचा प्रेक्षकांवर सखोल प्रभाव पडेल कारण आजवर अशा प्रकारच्या कार्यक्रम कधी प्रसारितच झालेला नाही. या कार्यक्रमातील भक्तिसंगीताद्वारे साºया जगाला भारताच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडेल. या संगीतातून भारतीय संस्कृतीची मुळे घट्ट होतील आणि या व्यासपीठावरून हे स्पर्धक आपली कला साºया जगापुढे मांडतील. या कार्यक्रमातून दर्जेदार गायक निर्माण होतील आणि ते उत्तुंग कारकीर्द बनवितील, असा मला विश्वास वाटतो. या कार्यक्रमामुळे आपल्या देशाला नवा दृष्टिकोन लाभेल आणि यातील भक्तिसंगीतामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांना त्यांच्या सनातन धर्माच्या मुळापर्यंत घेऊन जाईल.

………………………………………………………………………………………….
अक्कीने शेअर केले मालदिव व्हेकेशनचे फोटो

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपले आगामी चित्रपट आणि फनी अंदाज यामुळे चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. तो नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना फिटनेससाठी प्रेरित करत असतो. आता नुकतेच त्याने आपल्या सोशल मीडिया हँडेलवर आपल्या मालदिव व्हेकेशनचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तो समुद्रकिनाºयावर सायकलिंगचा आनंद घेताना दिसून येतोयं.
या व्हिडीओत अक्षय कुमार कमालीचा खूश दिसून येतोयं. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करून अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘जेव्हा तुमचा सोमवार रविवारप्रमाणे दिसेल.’ अक्षयचा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर चाहत्यांना खूप पसंत पडत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून त्यावर कमेंट करताना दिसत आहेत.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सन २०२२ मध्ये त्याचे बॅक टू बॅक चित्रपट येणार आहेत. तो लवकरच चंद्र प्रकाश द्विवेदी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मानुषी छिल्लर आणि रिअल लाइफ हिरो सोनू सूदही महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याशिवाय अक्षय कुमार रक्षा बंधन, बच्चन पांडे, राम सेतु, राऊडी राठोड २ , ओएमजी २ सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …